देवगड : कांदळवन प्रतिष्ठान, इको फोक्स व्हेंचर्स क्लब आणि स्वराध्या फाऊंडेशन मालवण यांच्या सयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाटयगृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा २०२३ वर्षांमध्ये देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल ने घवघवीत यश संपादन केले. या नाट्यस्पर्धेमध्ये या हायस्कूलच्या ‘ बुरगुंडा ‘ या बालनाट्या प्रथम क्रमांकासहीत सर्वोत्कृष्ठ पुरुष अभिनय प्रथम धैर्य समीर सावंत, परीक्षक पसंती पुरुष अभिनय वेद योगेश बोभाटे, स्त्री अभिनय व्दितीय नेहा सुधीर पाटील, स्त्री अभिनय तृतीय सावरी रोहन कांबळे, सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंग प्रथम प्रचिती जितेंद्र शिर्के व अभिषेक कोयंडे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आज्ञा अभिषेक कोयंडे, सर्वोत्कृष्ट लेखन आज्ञा अभिषेक कोयंडे या विभागांमध्ये शाळेने उत्तुंग यश संपादन केले. इतर कलाकारांमध्ये स्वरा सदाशिव भुजबळ, शर्वरी गणपती शेडबाळे, स्वरूप गणेश मोहिते, श्रुती दत्ताराम वडार, श्रावणी विनोद कदम, अभिनव महेंद्र खडपकर, भाग्यवी प्रवीण खडपकर ढोलकी साथ हर्ष महेश बोंडाळे इत्यादींचा समावेश होता. या नाट्याचे नेपथ्य वळीवंडे येथील सुशील वळंजू याने केलेले होते. या साठी पालकांचे उत्तम सहकार्य लाभले. या नाटयासाठी आफरीन बांगी, प्रवीण खडपकर, ज्ञानेश्वर कुंभरे, सुरेश पवार या शिक्षकांनी तर विनोद तेली ( चतुर्थ श्रेणी कर्मचारी) यांनी विशेष मेहनत घेतली.या यशाबद्दल मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक सुनिल घस्ती, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्गाने विजेत्यांचे या उत्तम यशाबद्दल अभिनंदन केले आहे.दिनांक ३ मार्चला शाळेच्या वर्धापनदिना दिवशी सांस्कृतिक भवन जामसंडे येथे सायंकाळी ७.३० वाजता या नाट्याचा प्रयोग सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्था व शाळेतर्फे करण्यात आले आहे.