Home स्टोरी देवगड तालुक्यातील ग्रामीण कुटा या वित्तीय संस्थेच्या विरोधात जनसामान्यांच्या लढ्याला यश!...

देवगड तालुक्यातील ग्रामीण कुटा या वित्तीय संस्थेच्या विरोधात जनसामान्यांच्या लढ्याला यश! संतोष मयेकर

414

सिंधुदुर्ग: देवगड तालुक्यातील ग्रामीण कुटा या वित्तीय संस्थेच्या विरोधात जनसामान्यांना सोबत घेऊन उभारलेल्या ह्या लढ्याला आज प्रथमतः यश मिळालं. कालच्या खळ खट्याक आंदोलनानंतर देवगड पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थी ने ग्रामीण कुटाच्या अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाला ते घरोघरी जाऊन करत असलेली सक्तीची वसुली थांबवून कायदेशीर रित्या कार्यवाही करण्याची सक्त ताकीद प्रशासनामार्फत देण्यात आली.

आंदोलनात सहभागी झालेल्या महिला

यावेळी समवेत या आंदोलनाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र सैनिक संतोषजी मयेकर, बबलूजी परब, किशोरजी ठुकरुल, तोरसोळे गावचे शाखाध्यक्ष राजन पवार,विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, अभिजीत तेली उपस्थित होते. ही तर सुरुवात आहे,या पुढील लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी आणि जनहित कक्षाच्या साथीने लढून कायदेशीर लढाई जिंकायची आहे. या विषयी खंबीर पाठबळाकरिता सिंधुदुर्ग सहित मुंबईतील सर्व पदाधिकारी मान्यवरांचे तसेच उपस्थित राहून आम्हाला पाठींबा देणार्या महिला बचतगटाच्या असंख्य महिलांचे मनःपूर्वक आभार…. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कायम तालुक्यातील सामान्य जनतेसाठी त्यांचे प्रश्न घेऊन सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे..

आपला संतोष गोपाळ मयेकर, महाराष्ट्र सैनिक 8169657795