Home स्टोरी देवगड तालुक्यातील कमल लंगोटे या वृद्ध महिलेने वयाच्या ६५ व्या वर्षी कमवले...

देवगड तालुक्यातील कमल लंगोटे या वृद्ध महिलेने वयाच्या ६५ व्या वर्षी कमवले तब्बल १० लाख रुपये…!

90

देवगड: माणसाचे नशीब केव्हा, कधी आणि कोणत्या क्षणी चमकेल हे सांगता येणार नाही. माणूस नेहमीच पैसे कमवण्यासाठी आणि करिअर घडवण्यासाठी धडपडत असतो. कित्येक वेळा असं म्हटलं जातं की वयाच्या ४० शी नंतर माणूस काही करू शकत नाही. पैसे कमवायचे असतील तर तरुण वयातच योग्य वेळी योग्य काम करून पैसे कमवले पाहिजेत. एखादा काय वय झालं की पैसे कमवता येत नाही. किंवा करिअर घडवता येत नाही असा एक समज समाजात निर्माण झाला आहे. मात्र या सर्व विचारांना देवगड येथील ६५ वर्षीय महिला कमल लंगोटे अपवाद ठरली आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील देवगड तालुक्यातील मु. पो. जामसंडे, सात पायरी, वॅक्स म्युझियम च्या बाजूला राहणारी ६५ वर्षीय महिला कमल लंगोटे हिने ई  स्टोअर इंडिया (वेदिक आयुर केअर) या नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत काम करून तब्बल दहा लाखा पेक्षा अधिक रुपये कमवले आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षी एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये काम करून १० लाख रुपये कमवून कमल लंगोटे या वृद्ध महिलेने आजच्या तरुण पिढीसमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे. अर्थातच आजच्या तरुण पिढीने रोजगार मिळत नाही म्हणून भटकत राहण्यापेक्षा अशा कमल लंगोटे सारख्या वृद्ध महिलेचा आदर्श घेऊन पुढे चालणं खूप गरजेचे आहे.

देवगड तालुक्यातील कमल लंगोटे यांची मुलगी सीमा लंगोटे ही ई स्टोअर इंडिया या नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये प्रमुख लीडर म्हणून काम करत होती. सीमा लंगोटे ही नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणारी हुशार महिला मानली जाते. सिमा लंगोटे यांच्याकडूनच योग्य पद्धतीने काम शिकून सिमा लंगोटे यांच्या आई कमल लंगोटे या वयाच्या ६५ व्या वर्षी काही महिन्यातच लखपती झाल्या. अशी माहिती मिळत आहे.

आज काही लोकांचा नेटवर्क मार्केटिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. वेगळा म्हणजे नेटवर्क मार्केटिंग खूप वाईट क्षेत्र आहे, तसेच नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणारे व्यक्ती हे खूप वाईट असतात आणि फसवणारे असतात. अशी जणूकाय समजच झाली आहे. त्यामुळे कित्येक वेळा असं दिसून येतं की, नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांना काही लोक बहुतेक वेळा आपल्या दारात उभं पण करत नाहीत किंवा त्यांच्याशी मैत्री सुद्धा करत नाहीत. मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला खूपच वाईट वागणूक दिली जाते. खरं पाहता आजची वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी बघितली तर नेटवर्क मार्केटिंग या क्षेत्रात काम करून तरुणांना आपले करिअर नक्कीच बनवता येईल. या क्षेत्रात काम करून लखपती, करोडपती बनता येतं हे कित्येक लोकांनी सिद्ध करून दाखवले आहे. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील ६५ वर्षीय वृद्ध महिला कमल लंगोटे होय. नशीबाला दोष देत बसणाऱ्या युवक युवतीने कमल लंगोटे या महिलेचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल करणे गरजेचे आहे. कमल लंगोटे वयाच्या ६५ व्या वर्षी ई स्टोअर इंडिया या नेटवर्क मार्केटिंग कंपनीत काम करून लखपती झालेली आहे. त्यामुळे साहजिकच नेटवर्क मार्केटिंग खूप वाईट आहे किंवा नेते मार्केटिंग मध्ये काम करणारे व्यक्ती वाईट आहेत असं म्हणणं योग्य नाही. तर आजच्या बेरोजगारीवर नेटवर्क मार्केटिंग हा योग्य पर्याय आहे. असं म्हणणं योग्य होईल.