Home स्टोरी दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

61

चहू वेदी जाण षट्शास्त्री कारण। अठराहि पुराणे हरिसी गाती ॥। मंधुनी नवनीता तैसे घे अनंता। वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ।। एक हरि आत्मा जीव शिव समा वायां तू दुर्गमा न घालि मन ।। ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ। भरला घनदाट हरि दिसे ।।

अभंगाचा भावार्थज्या हरिचे निर्गुण स्वरुप जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात, जो हरि षट्शास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे व ज्या हरिचे अठरा पुराणे गुणगान करतात, त्या हरिला, ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे, प्राप्त करून घे व बाकीच्या व्यर्थ गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर. एक हरिच आत्मा आहे व जीवशिव रुपाने तोच आहे, हे जरी तत्वत: खरे असले तरी या दुर्गम-अवघड विषयात तू विनाकारण मन वालू नको. ज्ञानदेव म्हणतात, हरिपाठाने मला सर्वत्र हरिच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे.

// जय जय राम कृष्ण हरी //