Home स्टोरी दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ५ आणि...

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ५ आणि अर्थ.

78

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा,

मना सत्यसंकल्प जीवी धरावा,

मना कल्पना ते नको विषयांची,

विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ||५||

अर्थ: पापकर्म करण्याचे मनात आणू नये. नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा. विषयवासना मनात असू नये. कारण त्यामुळे लोकांमध्ये छी थूच होते.मनात पापी विचार येऊ देऊ नये. आलेच तर ते लगोलग सोडून द्यावेत. केवळ सत्याचा ध्यास धरावा आणि सद्विचारानाच मनात थारा द्यावा. संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे त्याचा विचार करावा. अर्थातच,रामदास समर्थ सांगताहेत की, हे मानवा, तू तुझ्या पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध, सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे, दुष्टबुद्धीने पापाचाराकडे नेणारे असे असू नये याची जाण ठेव. विषयवासना आणि त्यातून उपजणारे पापकर्म यांची समाजात, जनमानसात केव्हाही छी थूच होते. म्हणून तू अशा विषयवासनांची कल्पनाही मनात येऊ देऊ नकोस.