Home स्टोरी दिनेश दळवी आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित   .

दिनेश दळवी आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित   .

115

सिंधुदुर्ग:

 

हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार २०२३ साठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आलेख पाहता आमच्या संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दहिबाव गावचे सुपत्र व सध्या जोशी विद्यामंदिर जामसंडे नंबर एक प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिनेश सुरबा दळवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण मडगाव समर्थगड गोवा येथे देशाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील फडतरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण रविवार १ ऑक्टोबर २०२३ श्री स्वामी समर्थ सभागृह मडगाव येथे करण्यात आले.

यावेळी आमदार उल्हास तूयेकर, उदय बने ,अँड आशा देसाई,महेश थोरवे, शाहू महाराज, श्री स्वामी समर्थ मडगाव मठाचे जयेष नाईक आदी उपस्थित होते.

दिनेश दळवी सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजू व होतकरू मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी स्वतः दिव्यांग असून देखील त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देखील दिले त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात चांगल्या ठिकाणी कार्यरत देखील आहेत . या संस्थेच्या वतीने त्यांच्या या कार्याचा गौरव केल्याबद्दल जिल्हाभरातील शिक्षक वृंदांच्यावतीने तसेच माजी विद्यार्थी व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.