सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्यातील बापार्डे बौद्धवाडी येथे राहणारे भारत सपकाळ वय ५० याने दारुच्या नशेत मध्यरात्री आई आणि आपला सख्खा भाऊ यांची दांड्याने ठेचून हत्या केली अशी माहिती मिळत आहे. ही घटना काल मंगळवारी सकाळच्या सुमारास समोर आली. आई शोभा मुरारी सकपाळ वय ७५ आणि मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ वय ५५ अशी मृतांची नावे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत मुरारी सकपाळ रा. बापर्डे बौद्धवाडी याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेतच त्याचा घरामध्ये आई आणि भाऊ यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास आई शोभा मुरारी सपकाळ आणि मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ यांची झोपेत असताना त्याने दांड्याने ठेचून हत्या केली. दररोज सकाळी पाच वाजता उठणाऱ्या शोभा सपकाळ आणि त्यांच्या घरातली मंडळी अजून का उठली नाही? म्हणून येथील ग्रामस्थांनी याची माहिती गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा क्रूर प्रकार सोमोर आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.