Home राजकारण त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी आज होणार मतदान….

त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी आज होणार मतदान….

67

त्रिपुरा राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी गित्ते किरणकुमार दिनकारो यांनी सांगितलं की, गुरुवारी ६० सदस्यीय त्रिपुरा विधानसभेसाठी मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात ३,३३७ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असल्याचंही यावेळी दिनकरो यांनी सांगितलं. यापैकी १,१०० मतदान केंद्रे संवेदनशील आणि २८ अतिसंवेदनशील आहेत.भाजप आयपीएफटीसोबत युती करुन या निवडणुका लढवत आहे. त्यामुळे सीपीआय काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहे. याशिवाय माजी राजघराण्याचे वंशज प्रद्योत बिक्रम यांचा टिपरा मोथा हा पक्षही निवडणूक लढवत आहे. यासोबतच ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीही या निवडणुकांमध्ये काही जागांवर निवडणूक लढवत आहे. राज्यातील विधानसभेच्या ६० जागांसाठी एकूण २५९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्रिपुरा विधानसभेसाठी आज मतदान पार पडणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.