Home स्टोरी तुळस ग्रामसभेत ग्रामस्थांना दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी मकरंद परब यांच्यावर वेंगुर्ला पोलीस...

तुळस ग्रामसभेत ग्रामस्थांना दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी मकरंद परब यांच्यावर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

144

सावंतवाडी वार्ताहर: तुळस ग्रामपंचायतची मागील १७ फेब्रुवारी २०२३ ची तहकुब ग्रामसभा, शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता तुळस ग्रामपंचायत कार्यालयात होती. यावेळी महिला, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थीत होते. ग्रामसभेस ग्रामसभेच्या अजेंडयाप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ नुसार ग्रामविकास समित्या गठीत करणे हा विषय होता. या विषयाला अनुसरुन ५० टक्के महिलांना समित्यांमध्ये स्थान दयावे असा नियम असताना चुकीच्या पध्दतीने ग्रामविकास समित्या ग्रामसभा सचिव बनवत होते. त्याला काही ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला. त्यावर ग्रामसभा अध्यक्ष तथा सरपंच त्यावर बहुमत चाचणी देऊन निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु तसे न होता सरपंच यांचे सख्खे दिर मकरंद परब ग्रामस्थांच्या अंगावर धाऊन जात होते. या अगोदरही अशीच परिस्थिती ते नेहमी निर्माण करत असतात. तसेच माजी सरपंच शंकर घारे ग्रामसभेत व इतर सभेत ग्रामस्थांच्या अंगावर येत होते. त्यामुळे महिला ग्रामस्थांनी घाबरुन बैठकीतून काढता पाय घेतला व घरी निघुन गेल्या. त्यानंतर ग्रामसभेची संख्या घटली. त्यानंतर गोरक्ष यांनी ग्रामसभेचा फोटो काढला या रागातून गोरक्ष उर्फ विकी ठुंबरे यांच्यावर भर ग्रामसभेत सरपंचांचे सख्खे दिर अंगावर धावत जाऊन हात पिळवटला हा मारहाणीचा प्रकार घडला. यावर सरपंच ग्रामसभा अध्यक्ष आणि ग्रामसेवक ग्रामसभा सचिव यांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. बैठकीतून घालवून दिले गेले नाही. त्यामुळे यावर प्रशासकीय यंत्रणेने लक्ष घालणे गरजेचे असून तुळस ग्रामपंचायतीतील जो मनमानी कारभार थांबविणे गरजेचे असून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचायत अधिनियम कायदयानुसार ग्रामपंचायत कार्यालयात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, ग्रामसभेचे व्हीडीओ शुटींग, ग्रामसभेंना पोलीस प्रोटेक्शन पुरविणे आवश्यक आहे. या गंभीर विषयात गटविकास अधिकारी, तहसिलदार, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालणे गरजेचे असून ग्रामपंचायतीत सी.सी.टी.व्ही. तसेच ग्राम सभा व्हीडीओ रेकॉर्डींग होणे गरजेचे आहे.आज शुक्रवार सायंकाळपर्यँत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्यादी गोरक्ष ठुबरे यांनी दखलपात्र गुन्हा रजि नंबर ६३/२०२३ भांदवी कलम ३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांनी दिली आहे.