Home स्टोरी तुळस गावात गेले तीन दिवस विजपुरवठा खंडित.

तुळस गावात गेले तीन दिवस विजपुरवठा खंडित.

146

वेंगुर्ला (तुळस):  गेले तीन दिवस वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात वीज पुरवठा खंडित झालेला आहे. गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे गैर होत आहे. आज महावितरण च्या अधिकाऱ्यांना याबाबत नागरिकांनी जाऊन जाब विचारलला असता नेमका अडथळा कुठे आहे? हे समजत नाही. तसेच याबाबत काम चालू आहे. अशी उत्तरे दिली जातात. मात्र या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांची गैरसयवत आहे.

जर आज संध्याकाळ पर्यंत लाईट आली नाही तर तुळस गावच्या च्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार यांनी दिली आहे. तशी समज हि महावितरण च्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनाचे अध्यक्ष तुषार राय, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, विद्या माळकर, आबा परब, गावडे आणि तुळस  गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.