Home स्पोर्ट तुतारी एक्सप्रेस क्र. ११००३ च्या वेळापत्रकात बदल!

तुतारी एक्सप्रेस क्र. ११००३ च्या वेळापत्रकात बदल!

103

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून सुटणारी दादर सावंतवाडी ट्रेन क्र. ११००३ च्या वेळेत येत्या ७ एप्रिल पासून बदल करण्यात आले आहेत. कोकण रेल्वेने तशी मंजुरी दिली आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रकहि कोकण रेल्वे बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्या दादर सावंतवाडी ट्रेन सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनवरून सायंकाळी ७ वाजून १० ( १९ मिनिटांनी निघत आहे. या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यात आला आहे. ७ एप्रिल पासून दादर सावंतवाडी ट्रेन (तुतारी एक्सप्रेस क्र. ११००३) सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनवरून रात्री ८ वाजता निघणार आहे. अशी माहिती कोकण रेल्वे विभागाने दिली आहे.