कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड) – तिसगांवातील आगरी – कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तिसाई देवी जत्रेच्या मुहूर्तावर कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणार्या आणि कोराना काळातही विक्रमी गतीने निमिर्ती झालेल्या आई तिसाई उड्डाण पूलाच्या नावाचा फलक ऐन जत्रेत झळकला आहे. या फलकामुळे पुलाच्या सौंदर्यात भर पडल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्ष रखडलेल्या नवीन पुलाच्या कामावर कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केल्या नंतर निधीच्या पुर्ततेसह या पुलाचे काम कोरोना कालावधीतही अविरतपणे चालु ठेवून या पूलाचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती करण्यात आलेल्या या नव्या पुलाची ओळखही ‘आई तिसाई देवी उड्डाण पूल ‘ हीच अबाधीत रहावी या उद्देशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने या पुलावर एल ई डी विद्यृत रोषणाई असलेला नाम फलक लावला असल्याने पुलाचे सौंदर्य आणखिनच खुलून दिसत आहे अशी प्रतिक्रीया कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले .
Home स्टोरी तिसाई देवी यात्रेच्या मुहूर्तावर कल्याणच्या तिसाई उड्डाण पुलावर देवीच्या नावाचा नामफलक झळकला!...