Home स्टोरी तिसगांवातील तिसाई देवीच्या यात्रेला उद्या पासून प्रारंभ!

तिसगांवातील तिसाई देवीच्या यात्रेला उद्या पासून प्रारंभ!

78

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात आगरी – कोळी समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या तिसगांवातील तिसाई देवीच्या यात्रेला उद्या पासुन प्रारंभ होत असून ही यात्रे सलग तीन दिवस चालणार आहे. प्रती वर्षी चैत्र पौर्णीमा अर्थात हनुमान जयंतीच्या दिवशी सुरु होणाऱ्या तिसाई देवीच्या या यात्रेसाठी येणाऱ्या भक्तगणांत आनंद द्विगुणीत झाल्याचे चित्र आजरोजी पासुनच दिसुन येत आहे .उद्या सकाळी जरीमरी सेवा मंडळाचे संचालक भगवानशेठ भोईर यांच्या हस्ते देवीची विधीवत पूजा अर्चा अभिषेक झाल्या नंतर तिसाई भक्तांना देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदीर खुले करण्यात येणार आहे .सायंकाळच्या महाआरती नंतर ७ वाजता तिसाई देवीच्या प्रतिमेची सजवलेल्या पालखीतून तिसगांवात भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे . या यात्रेत परंपरेनुसार तिसाई भक्त मोठ्या श्रध्देने आणि आस्तेने सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे . देवीच्या यात्रेनिमित्त गांवदेवी मंदीराच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ३ वाजे पासुन भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे या कुस्त्यांच्या दंगलीत मागील प्रथे प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकीत पैलवान सहभागी होणार आहेत .यात्रे निमित्त संपुर्ण तिसगांव परिसरात आकाश पाळणे, मौत का कुआ, विविध खाद्य पदार्थांची लहान मोठी दुकाने, लहान मुलांच्या हौस मौजेचे विविध प्रकारची साधने स्थानापन्न झाली असुन संपूर्ण तिसगांव परिसर लहान मोठ्या व्यापार्‍यांनी व्यापून टाकला आहे . देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांसह कुस्तांच्या दंगलीचाही लाभ घेण्याचे आवाहन जरीमरी सेवा मंडळाचे संचालक भगवानशेठ भोईर, अध्यक्ष दत्ता गायकवाड, सचिव नरेंद्र सुर्यवंशी तसेच खजिनदार पंडीत आत्माराम भोईर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .