Home शिक्षण तिरोडा नंबर एक शाळेत आनंददायी शिक्षणातून जगण्याचे धडे.

तिरोडा नंबर एक शाळेत आनंददायी शिक्षणातून जगण्याचे धडे.

90

सावंतवाडी प्रतिनिधी: मार्च महिन्यात निसर्गात वसंत ऋतूची आणि उन्हाळ्याची सुरुवात होते .यावेळी झाडाला पालवी फुटते. माळरानावर पिवळी, गुलाबी ,निळ्या रंगाची फुले डोलताना दिसतात. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट या सर्व निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी शाळेबाहेरची खरी शाळा याच दर्शन आनंददायी शनिवार या उपक्रमातून जगण्याचे धडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिरोडा नंबर एक या प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक दिपक राऊळ यांनी आपल्या कल्पनेतून साकारली निसर्गातील शाळा.

वसंताच्या आगमनाने मुलांच्या जीवनात नवी आशा निर्माण होते. हा नवीन वनस्पतींच्या वाढीचा हा काळ समजला जातो .हिवाळ्यानंतर प्राणी ही पुन्हा सक्रिय होतात. तेव्हा ते घरटे बांधण्यात सुरुवात करतात .नवचैतन्य उत्कर्षाचा प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या या ऋतूत कृषी संस्कृतीचा अभ्यासही या उपक्रमातून शिकविला जातो .वसंताच्या आगमनाने मुलांच्या जीवनात नवी अशा निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात तसे पळसाला आलेला बहर ,करवंदीची फुले, शिवणीची फुले तर काटेरी झाडांला आलेली मोहक फुले अशा सुंदर फुलांच निरीक्षणही केलं जातं. तर विविध रान फुलांना पाहून अगदी फुलांना स्पर्श करून गंधही घेतात त्यातून संवेदना जागृत होण्यास मदत होते. या विविध फुलाने मुलांच्या आयुष्यात नवीन गोडवा दिलाच या ऋतूनी सृष्टी मुलांना सतत नव्या विचारांना कल्पनांना चालना देत असते. यावेळी अनेक सण येतात. अशावेळी सणांची ओळखही आणि संस्कृतीचा अभ्यासही मुलांना समजावून सांगतात.

निसर्गाशी अगदी संलग्न राहून मुलाना पक्षांच्या निरीक्षणाचा अभ्यास करून झाडांना येणारा मोहर नवीन अभ्यासाच्या पुस्तकाचे नवे पानच जणू तयारच केले आहे .आता विद्यार्थी जणू गाईडचंच काम करताहेत त्यातून निरीक्षणशक्ती, जिज्ञासूवृत्तीचा विकास होण्यास मदत झाली आहे.

तसेच विविध रान फुलांचा अभ्यास जेष्ठ व्यक्तींकडून करून घेतात तसेच विशिष्ट पानांची चव पाहण्याचा अनुभवही मुलांना दिला जातो. यातून बालपणीच्या आठवणींना उजाळा देत गावातील फेरफटका या उपक्रमातून गावाचे प्रत्यक्ष दर्शन यातून दिशा निश्चित करता येते. अगदी निसर्गात राहून प्रत्यक्ष मातीच्या जगण्याशी आणि त्याचप्रमाणे जेवण बनवण्याचा आनंद म्हणजे दगडी चूल बनवणे त्यात अग्नी प्रज्वलित करणे .त्यातून निघणारा धुर अगदी बालपणीच्या आठवणी ताज्या होतात तसेच हेच शिक्षण अनुभवण्यासाठी शैक्षणिक धोरणानुसार अध्ययन निष्पत्तीचाही पुरेपूर उपयोग केला जातो .अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दीपक राऊळ या शिक्षकांचे विशेष कौतुक केलं जात आहे.

 

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत आडारकर, उपाध्यक्ष निकिता केरकर ,उपसरपंच संदेश केरकर, नंदा पेडणेकर ,शमिका परब, सिद्धी आडारकर, अनिल गावडे ,विश्वनाथ आडारकर, सुषमा केरकर,धर्माजी कदम ,सायली गावडे, सार्थिका रगजी,शर्मिला सावंत, लक्ष्मी गव्हाणकर ,संगीता राळकर, नमिता सावंत,डॉ.शेट्ये मॅडम, नवार मॅडम इत्यादी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी पाककृती स्पर्धेत भाग घेऊन पुरणपोळी, मुगाची उसळ, पाणीपुरी, खीर,कोबी मंजुरियन इत्यादी स्वादिष्ट पदार्थ बनवून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी भाग्यश्री परब, आर्या आडारकर, यश केरकर, सिया आडेकर, सिताराम गोडकर ,यश गावडे, गंगाराम कदम, लवेश जाधव, आयुष रगजी, नैतिक सावंत, सुशांत मातोंडकर, सेजल आडारकर, भरत आडारकर,रिया साटेलकर या विद्यार्थ्यानी पाककृती स्पर्धेत सहभाग दर्शविला. सूत्रसंचालन दीपक राऊळ तर आभार मुख्याध्यापक जनार्दन प्रभू यांनी मानले.