Home क्राईम ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केली आईची हत्या!

ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केली आईची हत्या!

170

पंजाब: ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची हादरवणारी धक्कादायक घटना पंजाब राज्यातील पटियाळाच्या पंताडा येथील कांगथला गावात घटना घडली आहे. ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने एका नशाखोराने त्याच्या मित्रांसह आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी मुलाने धारदार शस्त्राने आईच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि घराबाहेर तिला जाळले. परमजीत कौर वय वर्ष ५० असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपींमध्ये परमजीत कौरचा मोठा मुलगा गुरविंदर सिंग उर्फ ​​गिंडा वय वर्ष २८ आणि त्याचे दोन मित्र राजिंदर सिंग उर्फ ​​राजा आणि रणजित सिंग उर्फ ​​राणा यांचा समावेश आहे. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.