अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संबंध जगजाहीर आहेत. याच दरम्यान इराणने १ हजार ६५० किलोमीटर रेंजच्या एका क्रुज मिसाइलची निर्मिती केली आहे. युक्रेन युद्धात रशियाकडून इराणच्या ड्रोनचा वापर करण्यात आल्यानंतर हे क्षेपणास्त्र पश्चिमी देशांची चिंता आणखी वाढवू शकतं. एवढच नाहीतर रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनीही अमेरिकेला प्रमुख कमांडरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.
हाजीजादेहने म्हटले आहे की…..
आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना मारू करू इच्छितो. शासकीय टीव्हीवर बोलताना त्यांनी सांगितले की, १ हजार ६५० किमी रेंजच्या नव्या क्रूज मिसाइलला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या मिसाइल शस्त्रागारात समाविष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय पहिल्यांदाच या मिसाइलचे फुटेजही दाखवलं गेलं. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये इराणच्या कमांडरने दावा केला होती की, देशाने हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाइल विकसत केले आहे.हाजीजादेह यांनी म्हटले की बगदादमध्ये २०२० सालामध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानींचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसानतंर जेव्हा इराणने अमेरिकन नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक मिसाइलहल्ला केला. तेव्हा त्यांचा हेतू बिचाऱ्या सैनिकांना मारण्याचा नव्हता. अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही ट्रम्पला मारू इच्छितो. माइक पॉम्पिओ (अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री) आणि सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश देणाऱ्या सैन्य कमांडर्सना मारलं पाहिजे.