कल्याण प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर्सची अवहेलना होऊ नये म्हणून शहरातील सर्व बॅनर्स संबंधीतांनी स्वःताहून कींवा त्या त्या प्रिन्टर्सच्या माध्यमातून सन्मानपूर्वक काढून घ्यावून महापालिकेला सहकार्य करावे. औपचारीक जयंती उत्सव संपला* असल्याने जयंतीसाठी लावलेले बॅनर्स अन्य बॅनर बरोबर महापालिकेकडून काढण्यास लवकरच सुरुवात होईल .हे बॅनर्स काढत असतांना बाबासाहेबांचा फोटोही फाटू शकतो . त्या मुळे भावना दुखावल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा घटना मागे अनेक ठिकाणी घडल्या आहेत. म्हणूनच बॅनर्स लावणारांनी स्वयंस्फुर्तीने हे बॅनर्स सन्मानपूर्वक काढून घ्यावेत ही कळकळीची विनंती.