Home स्टोरी डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनतर्फे मसुरेतील २० मुले दत्तक

डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनतर्फे मसुरेतील २० मुले दत्तक

130

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशन, कोल्हापूरच्या वतीने मसुरे मागवणेवाडीतील वीस मुले शालेय शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. या मुलांना इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व शैक्षणिक खर्च या फाउंडेशन तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी दिली आहे.मसुरे मागवणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वैद्य यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मसुरे मागवणे येथील वीस मुलांना फाउंडेशन तर्फे बारावीपर्यंत शैक्षणिक साहित्य व मदत देण्याचे डॉ. अनिल कुमार वैद्य आणि जाहीर केले. ग्रामीण भागातील मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी डॉ. नांदेडकर फाउंडेशनने जाहीर केलेल्या मदती बद्दल उपस्थित शिक्षक व पालकांनी डॉ. वैद्य यांचे आभार मानले.यावेळी पांडुरंग कुलकर्णी, निलेश नाईक, सुरेश परब, संतोष दुखंडे, रवींद्र दुखंडे, दत्ताराम सावंत, विकास बागवे, सिताराम दुखंडे यासह मागवणेवाडीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.