Home स्टोरी डॅमज करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा! शिवसेना उ. बा. ठा. पक्षाची विज...

डॅमज करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा! शिवसेना उ. बा. ठा. पक्षाची विज वितरण अधिकार्‍यांकडे केली लेखी निवेदनाद्वारे मागणी

163

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – नेतिवली सर्कल जवळ भूमिगत विज वाहीणी मोठ्या प्रमाणावर डॅमेज झाल्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरीकांना सलग ४८ तास विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागले . ही केबल डॅमेज करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा या प्रमुख मागणी सह अन्न मागण्यांचे निवेदन कल्याण पूर्व शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने टाटा पॉवर येथील महावितरण कंपनी च्या उच्च अधिकार्‍यांना देण्यात आले असून विज वितरण कंपनी च्या एकूणच व्यवहारात सुसूत्रता आली नाही तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे .सध्या उन्हाच्या झळा तप्त होऊ लागल्पा आहेत त्यातच विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे . याच बरोबर नवीन विज जोडणी साठी बाहेरून विज मिटर आणण्याची सक्ती केली जात आहे, अनेक ठिकाणी विज वाहन्या निधारीत उंची पेक्षा बर्‍याच खाली आल्या आहेत, त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. याच बरोबर निष्काळजी पणे खड्डा खोदतांना नेतीवली सर्कल येथ विज वाहिणीला क्षतीग्रस्त करणाऱ्या संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या सह अन्य मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता श्री. नरेंद्र धवड यांचे कडे चर्चेअंती देण्यात आले असून येत्या काही दिवसात महावितरण कंपनीने या समस्या निकाली काढाव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी श्री रमेश जाधव ,हर्षवर्धन पांलाडे ,नारायण पाटील ,सौ मिना माळवे ,सौ साधना पार्ट ,सौ नमिता शाहु ,गंभाजी लाड ,शांताराम गुळवे , नितीन मोकल ,गणपत घुगे ,किरण निचळ ,अरुण निंबाळकर ,संजय गुजर ,राजेद्र गायकवाड ,पुरोषत्म चव्हाण ,नितीन मोरे व ईतर पदअधिकारी उपस्थित होते.