Home शिक्षण डी.एड. कॉलेज बंद करण्यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नाहीत

डी.एड. कॉलेज बंद करण्यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नाहीत

56

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु यासंदर्भात कोणतेही शासन आदेश जाहीर झाले नाहीत. ‘नवीन शैक्षणिक धोरणात डी.एड. कॉलेज २०२८ पर्यंत चालू राहतील आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर बी.एड.मध्ये करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ डी.एड. कॉलेज बंद होतील, असा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे’, असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या उपसंचालक माधुरी सावरकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, अशी माहिती जळगाव जिल्ह्यातील डीएड प्राचार्य अनिल झोपे यांनी दिली.

केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे यांनी जळगाव जिल्ह्यात डी.एड.ची १२ महाविद्यालये आहेत. त्यासाठी इयत्ता १२ वीच्या निकालानंतर नोंदणी होते, अशी माहिती दिली आहे. डी.एड. कॉलेज बंद करण्यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नाहीत, असेही अशोक राणे यांनी सांगितले. बी.एड. चार वर्षांचेनवीन शैक्षणिक धोरणात बी.एड.च्या अनुषंगाने मोठे बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार बारावी उत्तीर्णांना बी.एस्सी. बी.एड., बी.ए., बी.एड. आणि बी.कॉम., बी.एड. हा चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. सुरुवातीला शासकीय कॉलेजमध्ये हे अभ्यासक्रम असतील. खासगी किंवा अनुदानित शिक्षण संस्थांना अजून परवानगी मिळालेली नाही. जळगाव जिल्ह्यात शासकीय कॉलेज नाही. उमविच्या कार्यक्षेत्रात बी.एड.चे २८ कॉलेज असून, १६०० विद्यार्थीसंख्या आहे. दोन वर्षांचे बी.एड. २०३० पर्यंत सुरू राहणार आहे, असेही प्राचार्य अशोक राणे यांनी सांगितले.