Home क्राईम ‘डीआरडीओ’चे अधिकारी डॉ. प्रदीप कुरूलकर यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे...

‘डीआरडीओ’चे अधिकारी डॉ. प्रदीप कुरूलकर यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश….

103

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून शुक्रवार दि. ५ मे रोजी अटक केली. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक ‘डीआरडीओ’चे अधिकारी डॉ. प्रदीप कुरूलकर यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यासह अन्य एक अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं महाराष्ट्र एटीएसने केलेल्या तपासात समोर आलं आहे. प्रदीप कुरूलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते. त्याच महिलेच्या संपर्कात अन्य एक अधिकारीही असल्याचे महाराष्ट्र एटीएसच्या तपासात समोर आलं आहे. एटीएसने त्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. प्रदीप कुरुलकरच्या रिमांड सुनावणीदरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा आयफोन जप्त केल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे.

महाराष्ट्र एटीएसने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते डीआरडीओ चे शास्त्रज्ञ कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छाननी करत होते. तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला. त्यानंतर एटीएसने त्या दुसऱ्या अधिकाऱ्याचा मोबाईल फोन आणि इतर संबंधित उपकरणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहेत. अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय किंवा गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही यावर पुढील कारवाई अवलंबून असेल असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.