Home राजकारण डिएडचे स्थानिक उमेदवार यांना शिक्षक नोकर भरतीत प्राधान्य मिळावे यासाठी ओरोस येथे...

डिएडचे स्थानिक उमेदवार यांना शिक्षक नोकर भरतीत प्राधान्य मिळावे यासाठी ओरोस येथे डिएड धारकांच्या बेमुदत उपोषणाला युवासेनेचा जाहीर पाठींबा-युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट

197

कुडाळ प्रतिनिधी: डीएडच्या स्थानिक उमेदवार यांच्या बेमुदत उपोषणाला युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी युवासेनेच्या वतीने पाठिंबा दिला,या लढ्यात युवासेना या स्थानिक उमेदवाराना सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाही युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली,यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,कुडाळ नगरसेवक उदय मांजरेकर,युवासेना शहरप्रमुख संदिप म्हाडेश्वर,युवासेना शहर समन्वयक अमित राणे,युवासेनेचे राजू गवंडे, युवासेना विभागप्रमुख मनीष तोटकेकर आदी उपस्थित होते. स्थानिक उमेदवारांना स्थानिक भरतीत ७० ते ८० टक्के प्राधान्य मिळालेच पाहिजे,त्यासाठी कायम पाठीशी युवासेना उभी असेल अशी भूमिका युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी मांडली.

उद्या युवासेना घेणार मुख्य कार्यअधिकारी यांची भेट-युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची माहिती

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

तसेच उद्या मुख्यकार्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन युवासेना पुढचे पाऊल टाकेल अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी माहिती दिली. तसेच डिएड नव्हे तर पुढच्या होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हव यासाठी युवासेना भविष्यात रस्त्यावर उतरून स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करेल.