Home Uncategorized डिंगणे – बांबरवाडी येथील हरिदेव मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

डिंगणे – बांबरवाडी येथील हरिदेव मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

66

बांदा: डिंगणे बांबरवाडी येथील हरिदेव मंदिर येथे मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सत्यनारायण महापूजा होणार आहे. तर सायंकाळी ७.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळ वेंगुर्लेचा ‘देवी मळगंगा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक नितीन सावंत तसेच बांबरवाडी, धनगरवाडी व डिंगणे ग्रामस्थ यांनी केले आहे. सौ. हर्षाली नितीन सावंत, श्री साईराज नितीन सावंत, श्री गणेश नितीन सावंत यांच्या उपस्थितीनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.