Home स्पोर्ट डांगमोडे येथील कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात पंचक्रोशी फोंडा व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत...

डांगमोडे येथील कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात पंचक्रोशी फोंडा व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत मालवण संघ विजेता.

96

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी फोंडा कबड्डी संघाने लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचा २३-४ असा पराभव करून १९ गुणांनी विजय संपादन केला.

महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेत मालवण महिला कबड्डी संघाने देवगड महिला कबड्डी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण १८ संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक कलेश्वर नेरुळ कबड्डी संघ व चतुर्थ क्रमांक रेवतळे मालवण कबड्डी संघाने पटकावला. विजेत्या एक ते चार संघांना रोख ७०००, रुपये ४००० रोख रुपये प्रत्येकी दीड हजार आणि कैलासवासी शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात आले. या स्पर्धेमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश घाडी, उत्कृष्ट पकड दीपक काळे, उत्कृष्ट चढाई सुयोग राजापकर, व शिस्तबद्ध संघ म्हणून शिवम प्रतिष्ठान सावंतवाडी संघाची निवड करण्यात आली. या सर्वांना रोख रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून हेमंत गावडे, प्रथमेश नाईक, दाजी रेडकर, नितीन हडकर, हेमंत तावडे, महेश सावंत, राजेश गोवेकर आणि गुणलेखक म्हणून महेश सावंत, राजेश गोवेकर यांनी काम पाहिले.

बक्षीस वितरण सोहळा

बक्षीस वितरण प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, बिळवस सरपंच मानसी पालव, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकूर, सोमा ठाकूर,हरी ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश ठाकूर, मंगेश ठाकूर, कल्पना ठाकूर, परेश ठाकूर, बापू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, गार्गी चव्हाण, अनिल ठाकूर, पूजा ठाकूर, पंकज ठाकूर,मंगेश चव्हाण, परशुराम ठाकूर, बाबू ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, संचित ठाकूर, विकास ठाकूर, संकेत ठाकूर, परशुराम चव्हाण आणि नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंकज वर्दंम, मंदार केनी, तालुका अध्यक्ष हरी खोबरेकर, बाबू आंगणे, पिंट्या गावकर,बाळा आंगणे आणि डांगमोडे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ प्रकाश ठाकूर व आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

फोटो कॅप्शन ..१)जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटातील विजेता पंचक्रोशी फोंडा संघ..

फोटो कॅप्शन ..२)निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेतील विजेता मालवण कबड्डी संघ छाया शैलेश मसुरकर