Home स्टोरी ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !इंग्रजी माध्‍यमांच्‍या ४२ शाळांचा समावेश….

ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !इंग्रजी माध्‍यमांच्‍या ४२ शाळांचा समावेश….

153

२ जून वार्ता: ठाणे जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्‍यात आली. आता शहरातील ४७ शाळा अनधिकृत असल्‍याची माहिती महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्‍ये सर्वाधिक इंग्रजी माध्‍यमाच्‍या ४२ शाळांचा, तर हिंदी माध्‍यमाच्‍या ३ आणि मराठी माध्‍यमाच्‍या २ शाळांचा समावेश आहे.अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने केले आहे.