Home राजकारण ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची? हे आमच्या हातात! आमदार नितेश राणे...

ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची? हे आमच्या हातात! आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य.

105

ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची? हे आमच्या हातात. असं वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तसेच पुढे होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरही आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.काय म्हणाले आमदार नितेश राणे? ठाकरे सेनेच्या तीन जिल्हा संपर्कप्रमुखांपैकी दोन जिल्हा संपर्कप्रमुख शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर एक आमच्या संपर्कात आहे त्यामुळे ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची? हे आमच्या हातात आहे. उद्धव ठाकरे यांनी नियमित निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. ठाकरे स्वतःची सेना बांधू शकले नाही. हे संपूर्ण महारष्ट्राची जनता पाहत आहे. सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेना संपली आहे. आम्ही व्हेंटिलेटरची वायर काढली की लगेच ठाकरे शिवसेचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. कारण नुकतेच नेमण्यात आलेले तीनही जिल्हा संपर्कप्रमुख आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही आमदार आणि खासदार आमचेच असणार आहेत असे भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.