Home राजकारण ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा...

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा !

98

सावंतवाडी प्रतिनिधी: खासदार विनायक राऊत यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केले आहे. आणि वैभव नाईक यांच्या जागी सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांचा समावेश आहे. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, आपल्याकडे पक्षवाढीचं काम दिल्यामुळे जिल्हाप्रमुख पद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. वैभव नाईक यांची जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला केल्यानंतर विरोधकांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. नव्याने नियुक्त केलेले तिन्ही जिल्हाप्रमुख आधीचे राणे समर्थक असूनही ठाकरे गटाकडून निष्ठावंतांना डावलून चांगली पदे राणे समर्थकाना दिली जातात, अशी टीका केली जात आहे.