Home स्टोरी टेक ऑफ घेताना विमान कोसळले

टेक ऑफ घेताना विमान कोसळले

155

२४ जुलै वार्ता: नेपाळमधील काठमांडू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. या अपघातात किमान १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पोखरा जाणाऱ्या विमानात एअरक्रूसह १९ जण होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दल अपघातस्थळी पोहोचले आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आज सकाळी हे विमान टेक ऑफ दरम्यान कोसळले. काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर ही दुर्घटना घडली. विमान कोसळताच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. विमानतळावर दूर वरून आगीचे लोळ दिसत होते. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली होती. अपघात स्थळावरून धुराचे लोट निघत होते. विमानाच्या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले आहे,