Home क्राईम टँकरमधून गॅसची चोरी करून विक्री केल्‍याप्रकरणी ३ जणांना अटक !

टँकरमधून गॅसची चोरी करून विक्री केल्‍याप्रकरणी ३ जणांना अटक !

258

छत्रपती संभाजीनगर: – थेट टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून ते व्‍यावसायिक सिलेंडरमध्‍ये भरणार्‍या तिघांना सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ५२ लाख ६८ सहस्र ८८३ रुपयांचा माल जप्‍त केला आहे. जावेदखान महंमद मुनाफ, शेख अफसर शेख बाबुमियाँ आणि कदीर शेख अब्‍दुल रज्‍जाक अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

 

टँकरमध्‍ये गॅस चोरून भरले जात असल्‍याचे समजताच पोलिसांनी वरील कारवाई केली.