सावंतवाडी: (रवी जाधव ):ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या सौजन्याने जन सेवार्थ पार्थिव शरीर शीतपेटीचे लोकार्पण सोहळा आज दि. १एप्रिल रोजी सावंतवाडी शिरोडा नाका येथे पार पडला. ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार श्री अरुण मिस्त्री यांनी एक प्रसंग कथन केला. ते म्हणाले ज्यावेळी माझी आई मृत्यू पावली होती त्यावेळी शीत शेव पेटीची आवश्यकता होती. परंतु मला कुठेही भेटू शकली नाही. म्हणून त्यावेळी मी हा प्रस्ताव ज्येष्ठ नागरिक संघाकडे मांडला असता एक मताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि आज ही शेव शीतपेटी सेवेमध्ये दाखल झाली. त्यामुळे आता प्रसंगाला या शेव शीत पेटीचा उपयोग होऊ शकेल. असं मत त्यांनी मांडले. या उपक्रमाला सल्लागार हणमंत देसाई यांचे जावई अशोक पाटील व मुलगी रोहिणी पाटील यांचा मोठा हातभार लाभला आहे. सेवेसाठी रूपाली मुद्राळे, अरुण मिस्त्री व प्रकाश राऊळ यांच्याकडे या सेवेची जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वजराटकर सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून ज्येष्ठ नागरिक संघाला अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले. याप्रसंगी डॉ. संदीप सावंत, डॉ.दीपक लादे, डॉ.निखिल अवधूत, तसेच आयुर्वेदिक तज्ञ डॉ.चंद्रकांत सापळे दोडामार्ग व डॉक्टर दत्तप्रसाद पावसकर उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बळवंत मसुरकर, उपाध्यक्ष बी एन तेली, सचिव प्रकाश राऊळ, सहसचिव सुधीर धुळे, खजिनदार अरुण मिस्त्री, सदस्य मा. प्राध्यापक सुभाष गोवेकर, अनंत माधव, नारायण मालवणकर, सुप्रिया धुमे, सीमा नाईक, सुलभा टोपले, शिवाजी आळवे, बाळकृष्ण मुळीक, गुरुदास पेडणेकर, हणमंत देसाई, रूपाली मुद्राळे, वझे मॅडम, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, समीरा खलील कार्यक्रमाला उपस्थित होते.
Home स्टोरी ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या सौजन्याने जन सेवार्थ पार्थिव शरीर शीतपेटीचे लोकार्पण!