Home स्टोरी ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांच्या ‘निवळ’ व ‘आवतं’ ह्या दोन कथांचे सिंधुदुर्ग...

ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांच्या ‘निवळ’ व ‘आवतं’ ह्या दोन कथांचे सिंधुदुर्ग आकाशवाणीवरून होणार सादरीकरण

161

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी, कथालेखक व कांदबरीकार विठ्ठल कदम यांनी सामाजिक संप्रेषणाच्या अनेक’ ह्या लिहिलेल्या असून त्यांच्या ‘निवळ’ व ‘आवतं’ हया दोन कथांचे सिंधुदुर्ग आकाशवाणीवरून सादरीकरण १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता GMT+0530 (india Standard Time) वरून केले जाणार आहे.

 

याआधी विठ्ठल कदम यांची आकाशवाणीवरून मुलाखत, काव्यवाचन, व अभिवाचन प्रसारीत झालेले आहे. श्री. कदम यांचा ‘ रुमणी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, ‘एकदा काय झाले’ ही बालकांसाठी कथा संग्रह, ‘चार पावले दूर’ ही रिमांड होममधील मुलांच्या जगण्यावर प्रकाश टाकणारी कांदबरी वाचकांत प्रिय झालेली आहे.

‘मुकरी’ हा त्यांचा आगामी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून ‘पासून – पर्यंत’ हा काव्यसंग्रह लककरच प्रकाशित होणार आहे. साहित्य चळवळीतील विठ्ठल कदम हे आज आघाडीचे नाव आहे.