Home स्टोरी ‘ज्ञानदीप’चे कार्य कौतुकास्पद, आवश्यक ते सहकार्य करू..! – जिल्हा क्रीडा अधिकारी...

‘ज्ञानदीप’चे कार्य कौतुकास्पद, आवश्यक ते सहकार्य करू..! – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस.

144

सावंतवाडी: ज्ञानदीप शैक्षणिक मंडळाचे कार्य अत्यंत आदर्श व कौतुकास्पद असून आपल्या कार्याने ज्ञानदीपने स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. आगामी काळात ज्ञानदीप शिक्षण मंडळाला आवश्यक ते सहकार्य करू, असे विचार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांनी व्यक्त केले.

ज्ञानदीप शिक्षण मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांना शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार एस. आर. मांगले, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस आदी उपस्थित होते.

दरम्यान ज्ञानदीप शिक्षण मंडळ गेली १८ वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधायक उपक्रम राबवित असल्यामुळे यापूर्वी ज्ञानदीपला शासन स्तरावरून आदर्श संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी समाधान व्यक्त करून ज्ञानदीपचे कौतुक केले. तसेच आगामी काळात ज्ञानदीपला योग्य ते सहकार्य करू, असेही सांगितले.