Home स्टोरी राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित, राजापूर यांच्या वतीने पुणे येथे दोन...

राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित, राजापूर यांच्या वतीने पुणे येथे दोन दिवसांचे सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन

62

सावंतवाडी प्रतिनिधी: आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांचा जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. विशेषतः यूरोप व संयुक्त राष्ट्रसंघातील देश हे सेंद्रिय शेतीविषयी अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. कारण तेथील शेतकऱ्यांची, ग्राहकांची व सरकारी राज्यकर्त्यांची सेंद्रिय शेतीविषयी असलेली मानसिकता आदर्शवत आहे. पर्यावरण व आर्थिक अशा दुहेरी हेतूने सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. हे लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे संशोधन, प्रशिक्षण, प्रमाणीकरण, शेतमालाचे मूल्यवर्धन, विकास या बाबींना प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक असल्याने सध्याच्या युगात सेंद्रिय शेती करणे नितांत गरजेचे आहे.

सेंद्रिय शेती काळाची गरज

या सर्व गोष्टींचा विचार करून कोकणात योग्य पद्धतीने सेंद्रिय शेती विकसित व्हावी यासाठी राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित , राजापूर आणि जे. एस. डब्ल्यू. फाउंडेशन , जयगड, यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचे सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसांचे पूर्ण वेळ प्रशिक्षण शनिवार दि. १८ आणि रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी पुणे येथे आयोजित कारण्यात आले आहे. प्रशिक्षण, निवास व जेवणखर्च नि:शुल्क आहे. शिबिरादरम्यान प्रवास खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे. शेतकऱ्यांनी या नि:शुल्क प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. तसेच आप-आपल्या संपर्कातील इच्छुक शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करावे असे आवाहन राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित , राजापूर आणि जे. एस. डब्ल्यू. फाउंडेशन , जयगड यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही बॅच ३० व्यक्तींची असणार आहे. बॅच पूर्ण झाली की नोंदणी थांबवण्यात येणार आहे नांव नोंदणी साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क पुनाजी गुरव 9323691616, मंदार नार्वेकर 9225235125, प्रकाश गांवकर 8356049477