Home स्टोरी जेष्ठ दशावतार कलावंत अनंत लब्दे यांचे निधन!

जेष्ठ दशावतार कलावंत अनंत लब्दे यांचे निधन!

157

मसुरे प्रतिनिधी:  मुणगे कारीवणेवाडी येथील जेष्ठ दशावतार कलावंत,प्रगतशील शेतकरी अनंत सदाशिव लब्दे ( ८९ वर्ष) यांचे वार्धक्याने नालासोपारा- मुंबई येथे निधन झाले.आबा या टोपण नावाने ते ओळखले जात.  ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक  उत्तम गावठी वैद्य होते. गावात वैधकीय सुविधा नसताना त्यांचा मोठा आधार होता. आचरा बंदर बोट सेवा चालू असताना होडी व्यवसाय असल्याने अनेक जण  होडीने वाहतुकीसाठी त्यांना संपर्क करायचे. कुटुंबवत्सल व परोपकारी वृत्तीने ते सुपरिचित होते. वाडीतील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीचे ते कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, भाऊ, बहीण, जावई, पुतणे, नातवंडे आणि नात जावई असा मोठा परिवार आहे.श्री भगवती एज्युकेशन सोसायटी खजिनदार व रिझर्व्ह बँक सेवानिवृत्त अधिकारी सदाशिव उर्फ़ काका लब्दे यांचे ते काका होत.नालासोपारा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.