Home स्टोरी जिल्हा परिषद स्वनिधीतून होणारी भजन साहित्य लॉटरी सोडत पारदर्शक व्हावी! योगेश धुरी

जिल्हा परिषद स्वनिधीतून होणारी भजन साहित्य लॉटरी सोडत पारदर्शक व्हावी! योगेश धुरी

309

जिल्हा परिषद स्वनिधीतून भजन साहित्य लॉटरी सोडतीला प्रत्येक भजन मंडळाच्या एका सदस्यास आमंत्रित करावे, म्हणजे लॉटरी सोडत पारदर्शक होईल -युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

 सिंधुदुर्ग: अन्यथा सत्ताधरी पक्ष आपल्याच मंडळांना त्याचा लाभ घेतील,आणि सर्वसामान्यांच्या भजनी मंडळे बाजूलाच राहतील,तसे नियोजन त्यांचं चालू आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा चालू झाली आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून भजन साहित्य लॉटरी सोडतीला त्या जिल्हा परिषद मतदारसंघातील मंडळाच्या एका सदस्याला या सोडतीला आमंत्रित करावे जेणे करून ही लॉटरी सोडत पारदर्शक होईल.

 

याआधी जिल्हापरिषद चा वॉटर प्युरीपायरसारखा घोटाळा सर्वश्रुत आहे,भजन साहित्य पुरविणे या योजनेत घोटाळा होऊ नये यासाठी जिल्हापरिषद ने आम्ही जी सुचवलेली पद्धतीचा अवलंब करावा. अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. जेणेकरून या योजनेचा फायदा सर्वसामान्यांना होईल.