Home स्टोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

109

मसुरे प्रतिनिधी: शिवजयंती २०२३ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, बाल शिवाजी च्या वेशात कु लौकिक नार्वेकर व जिजाऊ च्या वेशात कु नव्या परब यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी मावळ्यांच्या,व पारंपरिक वेशात आले होते, दीपप्रज्वलन, पूजनंतर सर्व विद्यार्थ्यांनी #शिवजन्मसोहळा साजरा केला.यावेळी त्यांनी ‘झुलवा पाळणा’ हे अप्रतिम असे समूहनृत्य सादर केले. शिवचरित्रातील विविध भूमिकांचे छायाचित्रण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित विडिओ दाखवण्यात आले. यावेळी कार्यक्रमालाग्रा सदस्य श्री लक्ष्मण माडये, विषयतज्ञा सौ गौरी नार्वेकर, मुख्याध्यापक श्रीम शितल परुळेकर,उपशिक्षक श्री महेश कदम,अंगणवाडी कर्मचारी, सर्व पालक,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.