Home स्टोरी जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया अध्यक्ष केतनकुमार गावडे यांच्या मागणीला यश.

जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया अध्यक्ष केतनकुमार गावडे यांच्या मागणीला यश.

123

मळगाव ते तळवडे मुख्य रस्त्याच्या डागडुजी बाबत उपकार्यकारी अभियंता यांचे वेधले होते लक्ष.

 

बांदा प्रतिनिधी: आत्माराम परब): काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष तथा सचिव केतनकुमार गावडे यांनी तळवडे ते वेंगुर्ला मुख्य रस्त्याची मळगाव ते तळवडे पर्यंत झालेल्या दुरावस्थे बाबत उपकार्यकरी अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

सदर भेटी दरम्यान त्यांनी लवकरात लवकर सदर रस्त्याची डागडुजी करण्यात यावे अशी सूचना बांधकाम अधिकारी यांना केली. यासाठी त्यांनी  सतत पाठपुरावा आणि भ्रमणध्वनीद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवल्याने त्यांना यश मिळाले.

केतनकुमार गावडे यांनी केलेल्या मागणीचा विचार करून बांधकाम विभागाने त्वरित उपाययोजना करून डागडुजी करण्यास सुरुवात केली. यासाठी केतनकुमार गावडे यांनी बांधकाम अधिकारी यांचे आभार मानले.