Home राजकारण जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विरोधात थेट गुरांना घेऊनच कार्यालयासमोर आंदोलन!

जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विरोधात थेट गुरांना घेऊनच कार्यालयासमोर आंदोलन!

169

सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्हा आरोग्य यंत्रणेचा जाहीर निषेध – युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी जिल्हा आरोग्य यंत्रणेचा निषेध करत गावागावात गैरसोय होत असल्याच्या कारणावरून शिवसेनेचे तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे. या आंदोलनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गुरांना घेऊनच कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. हे आंदोलन सध्या जिल्ह्यात चर्चा विषय होत आहे. आंदोलना दरम्यान सरकार वर टीका करत शिवसेनेचे पदाधिकारी योगेश धुरी म्हणाले की, गेंड्याच्या कातडीच्या THO आणि DHO यांचा ग्रामीण भागातील जनतेशी काही देणे घेणे नाही. कर्मचाऱ्यांना कुठलीही रूग्णांशी देणे घेणे नाही.जिल्हा आरोग्य अधिकारी फोन पण उचलत नाहीत.पालकमंत्री सत्तेत मशगुल आहेत.माणगाव आरोग्य केंद्रा वर २४ गावांचे आरोग्य अवलंबून असताना आरोग्य यंत्रणा मात्र व्हेंटिलेटरवर आहे. आरोग्य केंद्रावर औषधेच उपलब्ध नाहीत. खोकल्याचे औषध नाही,TT चं इंजेवशन नाही, कॅल्शियम च्या गोळ्या नाहित, BP च्या गोळ्या नाहीत, सगळी औषध बाहेरून दिली जातात. मग आरोग्य केंद्र हवं तरी कशाला? असा प्रश्न ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश धुरी यांनी उपस्थित केला आहे. म्हणूनच गुरं बांधून एक आगळं वेगळं आंदोलन आंदोलन करण्यात आलं आहे. अशी माहिती योगेश धुरी यांनी दिली आहे.

ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश धुरी

एक बॉडी चेक अप ची मशीन धूळ खात पडली आहे. मात्र त्याचा बॅनर अजूनही टकाटक आहे. राज्याचा अर्थ संकल्प मांडला, मात्र लोकांना मुलभुत गरजा देखील हे सरकार भागवू शकत नाही हे खोके सरकार आहे. ४ तास होऊनही अजून औषधं उपलब्ध नाहीत.धो, THO फोनच उचलत नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात हे जनतेचे सरकार आहे. म्हणून आरोग्य मंत्र्यांच्या PA ला फोन केला त्यांनी पुढे ४ जणांचे नंबर दिले. पण एकानेही त्याचा पाठपुरावा केला नाही. हे महाराष्ट्रातील खोके सरकारचे दुर्दैव आहे. असे हे ठाकरे गटाचे पदाधिकारी युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे.