Home स्टोरी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या कदम प्रथम!पळसंब शाळा नंबर १च्या वतीने आयोजन

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या कदम प्रथम!पळसंब शाळा नंबर १च्या वतीने आयोजन

66

मसुरे प्रतिनिधी: जि. प. शाळा पळसंब नं १ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. आर्या किशोर कदम (एस एम हायस्कूल कणकवली) हिने प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक वैष्णवी नारायण जिकमडे (प्रगत विद्यामंदिर रामगड), तृतीय रिया संतोष कांदळगावकर (ओझर विद्यामंदिर) उतेजनार्थ साक्षी रविंद्र जिकमडे (प्रगत विद्यामंदिर रामगड) प्रथमेश राजेंद्र पुजारे (जनता विद्यालय त्रिंबक) यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकुण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री विनोद कदम, श्री गिरीधर पुजारे श्रीमती मानसी असरोंडकर, माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर, श्री भिकाजी पळसंबकर यांनी बक्षिसे प्रायोजित केली होती. या स्पर्धेमध्ये लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप लि यांनी सहभाग घेऊन सर्व विद्यार्थ्यांना वस्तुरुपाने बक्षिसे देण्यात आली. तसेच शा. व्य. समिती च्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण मालवण येथील श्री नागेश कदम, देवगड येथील श्री धर्मराज धुरत, तसेच कणकवली येथील वैभवी कसालकर कणकवली यांनी केले.यावेळी सरपंच श्री महेश वरक, उपसरपंच श्री अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, शा.व्य.स. अध्यक्ष रविकांत सावंत, रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे, शेखर पुजारे, मुख्याध्यापक श्री. विनोद कदम, मानसी असरोंडकर, श्रीम योगिता कदम, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. निवेदन श्री योगिता कदम, आभार श्रीम. मानसी असरोंडकर यांनी मानले.