Home स्टोरी जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी निर्देशाकडे सावंतवाडी नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष..

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी निर्देशाकडे सावंतवाडी नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष..

136

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने जनतेचे जीवन सुकर यावे म्हणून १०० दिवसांचा कृतिशील सात कलमी कार्यक्रम राज्यभर राबविला जात आहे. यातील एक कलम माणने नागरीकांच्या तक्रारीचा निपटारा त्वरीत करणे, सावंतवाडी शहरातील एक नागरीक श्री. पुरुषोत्तम देवराम केनवडेकर यांना शहरातील कारागृह जवळ बक्षिस पत्राने दिलेल्या जामिनावर अतिक्रम झाले हे निवर्शनास आले. ही जमिन सामाजिक बांधीलकीसाठी बक्षीस पत्राने वृध्दाश्रम, अनाथ आश्रम , शाळा, मुला मुलीचे वसतीगृह बांधण्यासाठी के. वैषराम संतु केनवडेकर यांनी स्वतःकडील तीन सुठे जमीन बक्षीस पत्राने बक्षीस म्हणून दिली आहे. या जमीनीवर विनापरवाना अनधिकृत बांधकाम झाले आहे. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासबंधी मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद यांच्याकडे निवेदन सादर केले. अनधिकृत बांधकाम आहे हे नगरपरिषद सावंतवाडी मान्य करूनही ते काढून टाकण्यासंबंधी विरंगाई करीत असल्याने सदरील बाब जिल्हाधिकारी महोदय यांच्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणली. या निवेदनावर जिल्हाधिकारी महोदय सिंधुदुर्ग यांनी दि. ३१/१२/२०२४ मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद यांना पत्र देवून आपल्या स्तरावर बांधकामाची पहाणी करून सदरील बांधकाम अनधिकृत असल्यास ते काढून टाकण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी व त्याबाबतचा अनुपालन आहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा परंतु अद्यापही मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद हे बांधकाम काढून टाकण्याबाबत कुचराई, अनियमितता, विरंगाई करीत आहे. या अनधिकृत बांधकाम संबंधी उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा उप विभागीय दंडाधीकारी, उप विभाग सावंतवाडी यांनी तात्काळ कारवाई करून अंतिम अहवाल सात दिवसात सादर करावा असे निर्देश दिले आहेत. असेच निर्देश सहाय्यक आयुक्त, नगरविकास शाखा, जिल्हाधीकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत, ह्या निर्देशांवर मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद यांनी कार्यवाही सोडाच अर्जदारास उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवलेले नाही.

 

सावंतवाडी नगरपरिषदेस स्थानिक आमदार निधीतून रूग्णवाहिका क्र. एमएच ०७ ३०२५ देण्यात आली. या रुग्णवाहिकेच्या माडधामध्ये आर्थिक अनियमितता तसेच इंधनावरील खर्चाची अनियमितता, सरणवाहीका चालकणाऱ्या वाहन चालकाची मोटर बाहन बहित स्वाक्षरी नसणे, कर्मचान्यांनी नातेवाईकासाठी रुग्णवाहीका वापरूनही सजावाहीकेचे भाडे जमा न करणे, ५००० किलोमिटर रुमावाहीका फिरुनही निगा देखभाल दुरुस्ती खर्च शुन्य असपी, रुरण वाहिकेचे एका किलोमिटरचे भांडे २०/- रूपये असून ही रूग्णवाहीका ५००० किलोमिटर फिरून एक लाख रूपये जमा होणे क्रमप्राप्त आहे. परंतु फक्त २९,०००/- हजार रूपये जमा झाले आहेत. याबाबत मोटर वाहन वहीची पडताळणी करून आर्थिक अनियमितता दुर करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन दिले असता उत्तर दिले नाही. याबाबत जिल्हाधिकारी महोदय, उप विभागीय अधिकारी (महसुल), सहाय्यक आयुक्त नगरविकास शाखा, सिंधुदुर्ग यांना निवेदन दिले असता वरील सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु यावरही अर्जदारास मुख्याधिकाऱ्याकडून उत्तर मिळालेले नाही.

 

शासनाने लोकसेवा हक्क, सुशांत सप्ताह, सात कलमी कार्यक्रम हे जनतेचे जीवन सुकर व्हावे म्हणून बहाल केले आहेत पण अशा अधिकाऱ्यांमुळे जनतेस आपल्या हक्कास मुकावे लागत आहे. यावर उचित कार्यवाही होईल ही अपेक्षा.