Home राजकारण जाणीवपूर्वक कोर्टाचं कुठलं तरी वाक्य काढून बोललं जात आहे! देवेंद्र फडणवीस

जाणीवपूर्वक कोर्टाचं कुठलं तरी वाक्य काढून बोललं जात आहे! देवेंद्र फडणवीस

55

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नपुंसक या शेऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. असं कोणतंही निरीक्षण केलेलं नाही. महाराष्ट्र सरकारने काय काय कारवाई केली हे दाखवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राविरोधात कारवाई केली नाही. कंटेम्प्ट केला नाही. इतर राज्यात काय काय होतं आणि फक्त महाराष्ट्रालाच कसं फोकस केलं जातं हे सरन्यायाधीशांनी दाखवून दिलं आहे. जाणीवपूर्वक कोर्टाचं कुठलं तरी वाक्य काढून बोललं जात आहे. या लोकांना न्यायालयाची कारवाई समजत नाही, अशी टीका त्यांनी केली.