मसुरे देऊळवाडा शाळेची विद्यार्थिनी.
मसुरे प्रतिनिधी: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेची विद्यार्थीनी कुमारी तेजस्वी आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत ओरोस येथे संपन्न झाला. यावेळी तिचे पालकही उपस्थित होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रुपये २१ हजार रुपये असे पारितोषिक तिला प्राप्त झाले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. तेजस्वी आनंद मेस्त्री हिचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी वडाचापाट केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी, श्री. नवनाथ भोळे, श्री. चौधरी, सौ. मालंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर व शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.तेजस्वी मेस्त्री हिच्या या उत्तुंग यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री. संजय माने, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य श्री. महेश बागवे, सरपंच श्रीम. सुरेखा वायंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.