जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
अर्थ : हे मना, या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे, तो तूच विचार करून शोधून काढ. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्व जन्मी जे कर्म केलेले आहे, त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते.
जय जय रघुवीर समर्थ!