Home क्राईम जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

135

जम्मू-काश्मीर: येथील तोता गली भागातील भट्टा डूरियन जंगलाजवळ सैन्याच्या ताफ्यावर जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने ग्रेनेड द्वारे केलेल्या आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. या ताफ्यातील शेवटी असणार्‍या एका ट्रकवर हे ग्रेनेड फेकण्यात आल्यावर त्याला भीषण आग लागली. यांतील एकूण ६ सैनिकांपैकी ५ सैनिकांचा या आगीत मृत्यू झाला. वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. त्यानंतर सैनिकांवर आक्रमण करण्याची ही घटना घडली आहे. २२ ते २४ एप्रिल या कालावधीत काश्मीरमध्ये जी २० परिषदेची बैठक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांनी हे आक्रमण घडवून आणल्याचे स्पष्ट होत आहे.