धनुष्यबाण’ पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ नावही शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? “नाव आणि चिन्ह गेलं तरीही उद्धव ठाकरे धैर्याने उभे आहेत. आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं वाटतं. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा एक व्यक्ती उभा राहतो आणि हजारो लोकांना संबोधित करतो, ही सोप्पी गोष्ट नाही. याच्या जागी दुसरं कोण असतं, तर अंथरूण धरलं असतं. पण, हीच खरी कसोटी आहे, एखाद्या व्यक्तीमत्वाची. अशा शब्दात छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. छगन भुजबळ स्वतःबद्दल बोलतांना म्हणाले की, अनेकजण म्हणतात मी समाजकारणी, राजकारमी, वक्ता, महापौर झालो. पण, कोणही हे सांगत नाही की जेलयात्रा सुद्धा आहे. जे म्हटल्यावर सर्वाना भीती वाटणार. ती काय आरामदायी यात्रा नसते. जेल काय असतं? ते अडीच वर्ष आतामध्ये राहिल्यावर कळलं. मात्र, तेव्हा सर्वात जास्त सहकार्य अनेक पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचं मिळालं. असं छगन भुजबळांनी सांगितलं.