Home स्टोरी चौकूळ गावातील शिमगोत्सवाबाबत थोडक्यात माहिती ! पारंपरिक पद्धतीने आजही होतो उत्साहात शिमगोत्सव...

चौकूळ गावातील शिमगोत्सवाबाबत थोडक्यात माहिती ! पारंपरिक पद्धतीने आजही होतो उत्साहात शिमगोत्सव साजरा

644

सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या कोकणात सध्या शिमगोत्सव म्हणजेच शिमगा सण जोरात सुरू आहे. आपल्या कोकणात गावागावात शिमगोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गावातील सर्व मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महत्त्वाचे म्हणजे कोकणात शिमग्यामध्ये सोंगं आणणे, मांडावर खेळणे, रंगबला करणे अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिमगा साजरा केला जातो. असाच आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिमगा साजरा करणारा एक गाव चौकुळ आहे. कोकणातील चौकुळ गावातील शिमगा उत्सव हा खूप वेगळ्या पद्धतीने आणि बघण्याजोगा असतो. या गावात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम करत शिमगा साजरा केला जातो. चौकुळ गावात जवळजवळ पंधरा ते वीस दिवस शिमगोत्सव असतो. विशेष म्हणजे सोंगं आणणे, मांडावर खेळणे, रंगबला करणे असे विविध कार्यक्रम या गावात होतात. त्यात प्रामुख्याने मुख्य कार्यक्रम म्हणजे या गावात सर्व वाडीवर रंगबला हा एक कार्यक्रम मोठ्या पद्धतीने फार पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने खेळला जातो. या कार्यक्रमात गावातील नागरिक आपापल्या कला सादर करतात. वेगवेगळ्या कला सादर करून लोकांना हसवतात.

वेगवेगळ्या गावकऱ्यांच्या कलेतून गावाकऱ्यांचे कलागुण यावेळी दिसून येतात. ज्या काळात टीव्ही, मोबाईल सारखी मनोरंजनाची साधने नव्हती त्या काळात अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे लोकांसाठी खूप मोठे मनोरंजन होते. आता एकवीसाव्या शतकात कालांतराने मोबाईल, टीव्ही हे फार मोठे मनोरंजनाचे साधन झालेले आहे. तरीसुद्धा अशा गावच्या कार्यक्रमांमध्ये आजही लोकांची मोठी गर्दी बघायला मिळते. आणि हे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

अशा गावात मोठमोठे कलाकार लपलेले आहेत. ज्या कलाकारांना मोठा स्टेज कुठे मिळाला नाही. पण असे हे कलाकारी कोणत्याही मोठमोठ्या कलाकारांपेक्षा कुठेही कमी नाहीयेत. फक्त एवढंच की ह्या कलाकारांना मोठा स्टेज मिळाला नाही. शहरामध्ये झालेले प्रत्येक कार्यक्रमाचे मोठमोठे tv चैनल आढावा घेतात. त्यामुळे साहजिकच तेथील कलाकारांना लवकरात लवकर प्रसिद्धी मिळते. लोकांना असं वाटतं की कलाकार फक्त शहरातच आहेत. पण तसं नाही, कलाकार गावागावात प्रत्येक ठिकाणी आहेत. फक्त त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही.

शिमगोउत्सवात वाजवलं जाणारं वाद्य घुमट

कोकणात शिमगोत्सवात ढोल, ताशा यांच्या गजरात रोमाट मारलं जातं. त्यातच एक महत्वाचे वाद्य घुमट आहे. या घुमटाचा वापर विशेषतः कोकणात शिमगोत्सवातकेला जातो.आपल्या गावात कशा पद्धतीने शिमगा साजरा होतो? याची माहिती आम्हाला नक्की पाठवा. आपल्या गावातील साजरा होणाऱ्या शिमगोत्सवाचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती आम्हाला पाठवा. आम्ही आम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर ती माहिती प्रसारित करू.