Home स्टोरी चौकुळ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चौकुळ येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ८७...

चौकुळ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चौकुळ येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ८७ वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

176

सावंतवाडी: पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी लष्करी सेवेत केलेले कार्य आदर्शवत होते. याचाच आदर्श घेऊन त्या काळात सावंतवाडी संस्थानातील तरुण सैन्यात दाखल झाले. तोच आदर्श आज गावागावात दिसत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान संस्थानातील हजारो तरुण सैन्यात दाखल झाले होते. हीच परंपरा आजही टिकून आहे, असे प्रतिपादन भरत गावडे यांनी चौकुळ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चौकुळ येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ८७ वी पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी गावचे प्रमुख सोनू गावडे, बापू गावडे, विठ्ठल गावडे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय पाटील, जि. प. शाळा नंबर एकच्या मुख्याध्यापिका शीतल गावडे, प्रमुख पाहुणे भरत गावडे, प्रा. मधुकर गावडे, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजला व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले.तसेच यावेळी श्री अवधूत आनंद सेवा मंडळ, धवडकी यांच्यावतीने देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे जनसेवा ट्रस्ट बांदा यांच्या वतीने सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सदर कार्यक्रम समर्थ साठम महाराज वाचन मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संस्थानातील भूतपूर्व राजे बापूसाहेब महाराज यांचा जीवन परिचय व्हावा, त्यांचे त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व लष्करी कार्य समजावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानानंतर काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

शेवटी आभार मुख्याध्यापक संजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास चौकुळ ग्रामस्थ, पालक मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.