Home स्टोरी चिंचवली गावातील कुंभारकर कुटूंबियांचे घर आगीत जाळून खाक!शहर प्रमुख महेश गायकवाड यांची...

चिंचवली गावातील कुंभारकर कुटूंबियांचे घर आगीत जाळून खाक!शहर प्रमुख महेश गायकवाड यांची ५० हजारांची तातडीची मदत

57

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – श्री मलंगगड पट्ट्यातील चिंचवली गावत रहाणारे सतीष कुंभारकर यांच्या घराला गुरुवारच्या मध्य रात्री अचानकपणे आग लागली . या आगीत घरातील सर्व चिज – वस्तू जळून खाक झाल्या परंतु सुदैवाने या आगीत जिवीत हानी झाली नाही कींवा कोणीही जखमी झाले नाही .चिंचवली गावातील सतीष कुंभारकर यांच्या कुटूंबियांवर या आगीमुळे संकटाचा डोंगर उभा राहिला होता . या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी आपल्या सहकार्यांसह घटना स्थळी धाव घेतली व पारिस्थितीचे गाभीर्य ओळखून कुंभारकर कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली व लवकर अन्नधान्य तसेच जिवनावश्यक वस्तू देण्याचे आश्वासन देत आगीमुळे गर्भगळीत झालेल्या कुंभारकर कुटूंबियाचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला .यावेळी अंबरनाथ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी महेश गायकवाड यांनी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली असून पंचनामे देखील तातडीने केले जाणार असल्याचे तहसील कार्यालय अंबरनाथ यांचेकडून सांगण्यात आले .या समयी उपतालुका प्रमुख संजय फुलोरे, चैनू जाधव, अशोक म्हात्रे विभागप्रमुख हिरामण पितळे, संदीप पाटील,अंकुश पाटील,युवा सेनेचे योगेश मढवी यांसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.