भारतीय जनता पार्टीने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी नुकताच दावा केला आहे. अनिल देशमुख म्हणाले की, “ही ऑफर मी घेतली असती तर महाविकास आघाडी सरकार कधीच पडलं असतं. देशमुख्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आता भाजपा नेत्यांकडून यावर उत्तरं येऊ लागली आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?….
त्यांना कोणताही प्रस्ताव नव्हता. मी तोंड उघडलं तर देशमुखांना काही उत्तर देता येणार नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झालं होतं? ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील. अनिल देशमुख हे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत. किंवा कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट दिलेली नाही.देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा. न्यायालयाने त्यांना केवळ जामीन दिला आहे. क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने बोलावं अशी मी त्यांना विनंती करेन. त्यांना कोर्टाने जामीन देताना सांगितलेल्या अटी आणि शर्थींचं त्यांनी पालन करावं. ते भाजपावर टीका करतील, चुकीचं बोलतील तर आम्हाला देखील उत्तर द्यावं लागेल.