Home स्टोरी घरची वाट चुकलेल्या ५७ वर्षीय वृद्ध महिलेला सामाजिक बांधिलकीची मदत

घरची वाट चुकलेल्या ५७ वर्षीय वृद्ध महिलेला सामाजिक बांधिलकीची मदत

108

काल गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रमिला राऊळ वय वर्ष ५७ ही वृद्ध महिला आपल्या घरची वाट चुकून सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॉपच्या समोरील रस्त्यावर बसून आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होती.

वाट चुकलेली वृद्ध महिला

याची माहिती कृषी साहित्य विक्रेते कौस्तुभ यादव यांनी सामाजिक बांधिलकीला दिली असता सामाजिक बांधिलकीची टीम तत्काळ सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॉप पोचली. व सदर महिलेला तिच्या घरचा पत्ता विचारला असता सुरुवातीला ती काहीच बोलत नव्हती. खूप प्रयत्नानंतर आपण ओठवणे येथे राहते असं सांगितले. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी पोलीस स्टेशनला फोन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद साहेब व तेली साहेब यांची मदत घेतली. व सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध लावला. सदर महिलेचे नातेवाईक कुडाळ येथे राहतात. हे समजताच पोलीस कर्मचारी तेली साहेब यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना सावंतवाडी येथे बोलावलं. कुडाळ वरून तिचे नातेवाईक रात्री ११ वाजता सावंतवाडी येथे पोहचले. तोपर्यंत रात्री ८ ते १ पर्यंत सामाजिक बांधिलकीची टीम त्या महिलेसोबत होती.

सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी महिलेला मदत करतांना

सामाजिक बांधिलकीच्या टीमने सदर महिलेला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. असता तिच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी व पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, समीरा खालील, आमीन खलील, कौस्तुभ यादव व पोलीस तेली साहेब व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.